बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात”

पुणे | गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana ranaut)देशाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर देशभरातून तिच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं. याशिवाय राजकीय वातावरणही तापलेलं पहायला मिळालं. अशातच कंगनाच्या या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी कंगनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य  हे भीक म्हणून मिळाले होते. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाल आहे, असं वादग्रस्त वक्तव्य कंगना रणौतनं केलं होतं. यावर आता कन्हैया कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात, असं म्हणत कन्हैया कुमारनं कंगनावर निशाणा साधला आहे. पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, पुण्यातील सभेत बोलताना कन्हैया कुमार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. अनेक मुद्द्यावर ते बोलले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते उपस्थित होते

थोडक्यात बातम्या – 

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार म्हणतात…

कोरोना अपडेट! राज्याच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More