बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण

मुंबई | उन्हाळा सुरु झाला असून त्यांचा तडाखाही जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या उष्णतेचा पारा जोरदार वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त तहान लागते, वारंवार पाणी प्यावंसं वाटतं. मात्र हेही एक गंभीर लक्षण असू शकतं.

मधुमेहाच्या मुख्य लक्षणांपैकी एक तहान लागणं हे लक्षण आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतल्या व्यक्तींना मधुमेह होत असल्याचं अलीकडे दिसून येत आहे. बदललेली जीवनशैली, चित्रविचित्र प्रकारचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि अनुवंशिक अशा कित्येक कारणांमुळे डायबेटीस होऊ शकतो.

डायबेटीस एकदा झाला की तो औषधोपचार, पथ्यं आदींच्या साह्यानं नियंत्रित राखता येतो, मात्र पूर्णपणे बरा कधीच होत नाही. डायबेटीसचा हळूहळू शरीरातल्या सर्व अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. डायबेटीस झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन काम करणं बंद करत असल्यामुळे त्याच्या रक्तातली साखरेची पातळी वाढते.

दरम्यान, जास्तीची साखर किडनी फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे ती साखर मूत्राद्वारे बाहेर पडत असते. डायबेटीस झालेल्या व्यक्तींना लघवीला जास्त वेळा लागणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. जास्त वेळा लघवी झाल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे जास्त प्रमाणातही पाणी पिऊ नये. जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच पाण्याचं सेवन करावं.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…

Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत

पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

“रोहित माझा कॅप्टन नाही, विराट कोहलीला कॅप्टन बनवा”

देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More