बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूखच्या पदरी निराशा! ‘या’ कारणामुळे आर्यनची आजची रात्र देखील तुरूंगातच

मुंबई | एनसीबीने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई केली आणि अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला ताब्यात घेतलं. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मंजूर झाला. मात्र त्याला काल सोडण्यात आलं नव्हतं. अशातच आता आर्यनला आज देखील सोडणार नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या पदरी निराशाच हाती लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनचा जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर अखेर न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला गेला. मात्र जामीन मंजूर करताना काही अटी देखील घातल्या गेल्या आहेत. जुही चावलेने आर्यन खानच्या प्रकरणात जामीनदाराची भूमिका बजावणार आहे. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने आता आर्यनला आजची रात्र देखील तुरूंगातच घालवाली लागणार आहे.

एनसीबीनुसार कटकारस्थान करण्यात आलं पण आर्यन कटात सहभागी असल्याचा कोणताच पुरावा नाही. आर्यनला क्रुझवर आमंत्रित केलेल्या गाबा आणि मानवलापण एनसीबीने अटक केली नाही, असा युक्तीवाद वकिल रोहतगी यांनी केला होता. तो युक्तीवाद आर्यनला जामीन मिळण्यासाठी निर्णायक राहिला.

दरम्यान, आरोपीने कोणतंही माध्यमांवर वक्तव्य करू नये. तसेच, दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 पर्यंत हजेरी लावणे बंधनकारक आहे. तसेच आर्यनला देश सोडून बाहेर जाता येणार नाही, अशी अट देखील न्यायालयाने घातली आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

शहनाजने सिद्धार्थला दिला ट्रिब्यूट; ‘या’ खास गाण्यातून वाहिली श्रद्धांजली

“बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, सरकार कोणावरही अन्याय करणार नाही”

टेनिस कोर्टातून थेट राजकीय मैदानात! लिंएडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

“माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, मी साधी सिगारेट देखील ओढत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More