बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशातील कोरोनाबाधित रूग्न बरे होत असल्याचं दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोकं वर काढलं असतानाच शुक्रवारी देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात काल 44 हजार 111 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत असतानाच आता रूग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर काल 57 हजार 477 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 738 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 4 लाख 1 हजार 50 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 95 हजार 533 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आत्तापर्यंत 3 कोटी 5 लाख 2 हजार 362 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 34 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे आणि देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात करण्यात आल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

“15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं पण आता…”

“अण्णा हजारे 7 वर्षांच्या कुंभकर्णीय झोपेतून खडबडून जागे झालेत”

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More