देश

लग्नाच्या 3 दिवस आधी मित्रानं तरुणाचं गुप्तांग कापलं; वाचा नेमकं काय घडलं!

लखनऊ | पैशांच्या व्यवहारातील वादातून तरुणाचं अपहरण करून लग्नाच्या अवघ्या 3 दिवसांआधी तरुणाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गंभीर घटना उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील आहे.

पीडित तरुणाच्या मित्राने इतर दोन साथीदारांना सांगून त्याचं अपहरण केलं होतं. आणि त्याचं गुप्तांग कापलं. मित्राने त्याला त्याच अवस्थेत सोडलं आणि पळ काढल्याची माहिती आहे.

सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना ईदगाम मोहल्ल्यातील असून येथे समीर नावाच्या तरुणाचा त्याचा मित्र परवेजसोबत एक लाख रुपयांवरुन वाद सुरू होता.

तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. येथे त्याची प्रकृती पाहून हाय सेंटर मेरठमध्ये हलवण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनुसार तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलच!; शिर्डीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध!

पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मोठे बदल, 10 संघांसोबत अशी रंगणार स्पर्धा!

कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!

बाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण!

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या