मुंबई | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता नोव्हेंबर अखेरपर्यंत झाली नाही तर, 1 डिसेंबसपासून राज्यभर गनिमी कावा आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा परळीचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश केरे-पाटील यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारने ठोक मोर्चाच्या आंदोलनानंतर ज्या मागण्या मान्य केल्या, त्याचा पाठपुरावा दोन महिन्यांत केला जाईल. पुढील आंदोलनासाठी राज्यभर दौरे केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत देखील पाठपुरावा केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे
-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना
-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…
-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड
-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल