बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक; 16 मे पासून मोर्चा काढणार

बीड | सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये आज या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चाची सुरुवात बीडमधून होणार आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा मेटे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दिला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील  विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

खुशखबर! यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More