बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; ‘या’ माध्यमातून मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई | असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने 2019 ते 2020 या काळात इलेक्टोरोल माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला आहे ते जाहीर केलं आहे. टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा,एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए या देशातील 14 पक्षांनी निवडणुक रोख्यांमधून देणगी जाहीर केली. सर्वात जास्त देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे. तर पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष यादीत सर्वात वरच्या स्थानी आहे.

व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे राजकीय पक्षांना देणगी दिली जाते.  2019 ते 2020 मध्ये 444.49 कोटी रूपयांच्या देणग्या देशातील फक्त चौदा प्रादेशिक्षक पक्षांना प्राप्त झाल्या आहेत. तर 42 प्रादेशिक्षक पक्षांचे एकूण उत्पन्न तब्बल 877.957 कोटी रूपये होते. यामध्ये शिवसेनेला 111.403 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर टीआरएस 130.46 कोटी रूपयांच्या उत्पन्नासह प्रथम स्थानी आहे. या अहवालानूसार वायएसआर- काॅंग्रेस पक्षाला 92.739 कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त झालं आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने दिलेल्या अहवालानूसार भाजपला 2555 कोटीचा निधी मिळाला आहे. 3427 कोटी रूपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी एकट्या भाजप पक्षाला 74 टक्के निधी प्राप्त झाला आहे. तो 2017 ते 18 झाली 71 टक्के झाला होता आणि तोच निधी यावेळी 3 टक्क्यांनी वाढला असून भाजपला 210 कोटी मिळाले आहेत.

दरम्यान, निवडणूक रोखे हे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही नागरिकांना खरेदी करता येऊ शकतं. त्यानंतर एक हजार रूपयांपासून ते एक कोटी रूपयांपर्यंत विविध किमंतीचे रोखे कोणत्याही पक्षाला देशातील नागरिक करू शकते.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवार 4 वेळी मुख्यमंत्री होते पण…’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More