बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

भोपाळ | मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 36 वर्षाच्या महिलेने अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलं आहे. एवढंच नाही तर ही बाब समोर आल्यानंतर महिला आणि तिच्या परिवाराने मिळून जे केलं त्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या संपुर्ण प्रकरणाची माहिती राजगढचे एसीपी प्रदीप शर्मा यांनी दिली आहे. संबंधित महिलेने 16 वर्षाच्या मुलाचं दोन वेळा लैंगिक शोषण केलं आहे. महिला ही राजगढ येथील रहिवासी असून त्याच गावातील मुलाला तिने तिचा शिकार बनवलं. मात्र याबाबतची माहिती महिलेच्या पती आणि सासूला समजताच जे झालं त्यानं सर्वांना धक्का बसला आहे.

महिलेच्या पती आणि सासूनी मिळून मुलाच्या परिवारकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच जर मागणी पुर्ण केली नाही तर खोट्या रेप केसमध्ये अडकवण्यात येईल अशी देखील धमकी दिली. तरी सुद्धा मुलाच्या परिवाराने पैसे दिले नाही. या कारणामुळे संबंधित महिला आणि तिच्या परिवाराने मिळून मुलाच्या शेतातील पपईची झाडे तोडली.

दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर फोन करुन संपूर्ण प्रकार सांगितला. आपल्या घराची बदनामी होईल यामुळे इतके दिवस मुलगा शांत होता.

थोडक्यात बातम्या-

सेक्स रॅकेट प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक झाल्यानं बॅालिवूड हादरलं, वाचा संपूर्ण कारवाई

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला!

मोदींवर नरसिंहराव आणि मनमोहन सिंग भारी, गुंतवणूकदारांना मिळाली सर्वाधिक कमाई

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More