बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का?’, कियारा झाली ट्रोल

मुंबई | हिंदी चित्रपट ‘कबीर सिंग’ मधून प्रचंड प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी अर्थातच कबीर सिंगची प्रिती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. अशातच तिच्या एका व्हिडीओने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला याहे. मात्र या व्हिडीओमुळे ती ट्रोल देखील होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत कियारा अडवाणी कारमधून उतरताना दिसतेय. कियारा कारमधून उतरली आणि एक वयोवृद्ध गार्ड समोर आला. त्यानं कियाराच्या कारचं दार उघडलं. शिवाय तिला सलामही ठोकला. हे पाहून नेटकरी संतापले.

तू तुझ्या गाडीचं दार स्वत: उघडू शकत नाही का?, असा सवाल करत नेटकऱ्यांनी कियाराला फैलावर घेतलं. त्या बिचाऱ्यांचं वय बघ. तू स्वत: गाडीचं दार उघडू शकत नाही का?, असं एका युजरनं लिहिलं. एका युजरनं तर चक्क कियाराची लाज काढली. वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून सलाम घेतेस, लाज वाटत नाही का? अशी कमेंट या युजरनं केली.

दरम्यान, माज आलेल्यांचे चित्रपटच बॅन करायला हवेत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरनं दिलीये. एका युजरनं शेम ऑन यू म्हणत आपला संताप व्यक्त केला. वयोवृद्ध गार्डचा सलाम घेणं कियाराला चांगलंच महाग पडलेलं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

थोडक्यात बातम्या-

“भाजपने आमचे आभार मानावेत; मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

“जे पद मिळालं त्यापेक्षा राणेंची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

आजारी असतानाही खडसे चौकशीसाठी हजर, म्हणाले ‘चौकशी मागे राजकीय हेतू आहे’

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर रजेवर; प्रभारी अध्यक्ष म्हणून केली ‘या’ व्यक्तीची नेमणूक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More