बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!

मुंबई | काही दिवसांपूर्वी 60 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर 1 एप्रिल पासून सरकारनं 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची असेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी 3 वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण यांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल. तसंच पासबूक, पासपोर्ट, रेशन कार्डदेखील ओळखपत्र म्हणून दाखवू शकता, असं केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण यांनी सांगितलं आहे.

आतापर्यंत देशात 807 युके व्हेरिअंट्स, 47 साऊथ आफ्रिकन व्हेरिअंट्स आणि 1 ब्राझिलियन व्हेरिअंट दिसून आले आहेत. पॉझिटिव्ह रेटच्या साप्ताहिक राष्ट्रीय सरासरीबाबत सांगायचं झालं तर तो 5.65 टक्के आहे. महाराष्ट्रात तो 23 टक्के आणि पंजाबमध्ये 8.82 टक्के इतका आहे. याशिवाय छत्तीसगढमध्ये 8 टक्के, मध्यप्रदेशात 7.82 टक्के आहे. होम क्वारंटाईन बद्दल पाहताना त्याचं पालन केलं जातंय का नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही, असंही आर. भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Shree

थोडक्यात बातम्या – 

मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक

मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!

फेसबुकला मोठा फटका, कंपनीची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सचीही मोठी नाराजी

संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून नव्या वादाला सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More