Mamta Kulkarni | नव्वदच्या दशकात आपल्या मादक अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni |) आज संन्यस्त जीवन जगत आहे. पण एकेकाळच्या या ग्लॅमरस अभिनेत्रीचा प्रवास आणि अध्यात्मिक मार्ग वादांपासून दूर राहिलेला नाही.
चित्रपट कारकिर्दीतील एक वादग्रस्त किस्सा:
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ममताने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तिने १९९६-९७ मधील नवरात्री दरम्यानचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझ्या गुरूंचा १९९७ मध्ये माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. तेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करत होते. शूटिंगला जाताना मी तीन बॅग्ज घेऊन जायचे – एक कपड्यांची, दुसरी मेकअपची आणि तिसरी मंदिराची. मी सेटवर जाण्यापूर्वी माझ्या खोलीतील टेबलावर मांडलेल्या मंदिरात पूजा करायचे.”
नवरात्रीचा उपवास आणि ‘त्या’ रात्री ताजमधील घटना
ममता पुढे सांगते, “मी नवरात्रीचे व्रत अगदी मनापासून पाळायचे. मी नऊ दिवस उपवास करायचे आणि सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा हवन करण्याचा संकल्प केला होता. मी ३६ किलो चंदनाच्या लाकडाने यज्ञ केला होता. तेव्हा माझा फॅशन डिझायनर मला म्हणाला, ‘ममता, तू खूपच गंभीर झाली आहेस. थोडं रिलॅक्स हो!’ त्याने मला ताज हॉटेलमध्ये नेण्याचा हट्ट केला.”
ताजमध्ये गेल्यावर ममताने दोन पेग स्कॉच घेतली आणि उपवासामुळे तिला लगेचच नशा चढला. “दोन पेग घेताच मला वाटले की सगळी दारू माझ्या डोक्यात गेली आहे. मी वॉशरूममध्ये गेले आणि तिथेच ४० मिनिटे बसून राहिले. त्या नऊ दिवसांत मी काहीही खाल्ले नव्हते, त्यामुळे दारूचा परिणाम लगेच झाला,” असे ममताने (Mamta Kulkarni |) सांगितले.
ममता सांगते, “माझ्या गुरूंना जाणवले की बॉलिवूडमध्ये राहून मी फार काळ साधनेच्या मार्गावर चालू शकणार नाही. म्हणून त्यांनी माझ्यासाठी अशा ठिकाणी तपश्चर्या निश्चित केली जिथे मी पुढील १२ वर्षे कोणालाही भेटू शकणार नव्हते.”
२०२५ च्या महाकुंभात किन्नर आखाड्याने ममताला महामंडलेश्वर पद दिले. पण अवघ्या सात दिवसांतच तिला या पदावरून हटवण्यात आले. यामागे किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अजय दास यांनी त्रिपाठींना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती, तर त्रिपाठींनी हा आरोप फेटाळून लावला. या वांदानंतर ममता कुलकर्णी आणि त्रिपाठी दोघांनाही पदावरून हटवण्यात आले.
मला महामंडलेश्वर व्हायचे नव्हते – ममता
या संपूर्ण प्रकरणावर ममता म्हणते, “मला कधीही महामंडलेश्वर व्हायचे नव्हते. पण किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आग्रहामुळे मी ते स्वीकारले.” अनेक वाद, विस्मय आणि वळणे असलेला ममता कुलकर्णीचा हा प्रवास तिच्या चाहत्यांसाठी निश्चितच चर्चेचा विषय ठरला आहे. एकेकाळची ग्लॅमरस अभिनेत्री ते संन्यस्त साध्वी असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असला तरी, तिच्या आयुष्यातील वाद आणि वादग्रस्त घटना तिच्या अध्यात्मिक मार्गावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
Title : From Glamour to Renunciation and a Controversial Title The Journey of Mamta Kulkarni