मुंबई | राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. याबाबतचे विधेयक आज विधानपरिषदेत एकमताने मंजूर झालं आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा राज्यभर लागू होणार आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. यानंतर विधानसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात मंगेश कुडाळकर यांनी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं
सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक विधानपरिषदेत मांडले जाणार असून त्यानंतर ते मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विधानसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
दरम्यान, ज्या खासगी शाळा शैक्षणिक शुल्कांचे नियम धाब्यावर बसवतात. अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास होणार इतक्या लाखाचा दंड
असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही- रूपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करणार- अनिल देशमुख
तुमची मुलं इंग्रजी शाळेत का शिकली?; उद्धव ठाकरे म्हणाले…
“दिल्लीत दुसऱ्यांदा 1984 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही”
Comments are closed.