पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

पुणे | पुणे महानगरपालिकेत मराठा आरक्षणावरून प्रचंड गोंधळ झाला. यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले आक्रमक झाले त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या आसनासमोरील कुंडी व ग्लास फोडला.

आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. मात्र सभा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने मराठा आरक्षणासाठी सभागृहात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. 

दरम्यान, शिवसेना आक्रमक झाल्यानंतर या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेचे सदस्य सहभागी झाले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला अन् सभागृह तहकूब करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या–

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या