बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष…’, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

मुंबई | 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi Government) 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने महाविकास आघाडीचं सर्वत्र कौतुक सुरु असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीच्या 2 वर्षाच्या कामाकाजाचा लेखाजोखा थेट कवितेतूनचं मांडला आहे. त्यांनी ट्विटकरून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये देशमुखांच्या 100 कोटींच्या घोटळ्याचं वर्णन करत एसटी कर्मचाऱ्याच्या संपावरून अनिल परबांवर निशाणा साधला आहे. तर हसन मुश्रिफांवर टीका करताना मुश्रिफांना टेंडरची मलाई असं म्हणून हिणावलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर देखील नवाब मलिक – दाऊद का भाई असं म्हणत घणाघात केला आहे.

पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘निलेश लंकेची गुंडाई, मेहबुब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफगांई , राऊतांची नुसती कोल्हेकुई,’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी मधील नेत्यांवर टीका केली आहे. शिवाय त्यांनी एकाच कवितेतून महाविकास आघाडीवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी शेवटी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधून ‘2 नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’ असा टोला लगावला आहे. अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला 2 वर्ष पुर्ण झाल्यावरून सरकारवर टीका केली होती. मात्र, चित्रा वाघ यांनी अनोख्या पद्धतीने महाविकास आघाडीवर केलेली टीका विशेष चर्चेचा मुद्द ठरत आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘दी़ड फूटी उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झाला आहे’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची भेट टळली; ‘हे’ कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More