बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकांना कपडे कसे घालावे याचा सल्ला देते आणि स्वतः…’ ‘त्या’ फोटोवरुन कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

मुंबई | बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

नुकतंच कंगनानं सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. कंगनानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती किनाऱ्याजवळ पोझ देताना दिसत आहे. कंगनानं खूप दिवसांनंतर असा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानं ती पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. या फोटोंमुळे तिला सध्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

कंगना लोकांना कपडे कसे घालावे याचा सल्ला देते आणि स्वतः ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते, असं म्हणत नेटकऱ्यांनी कंगनावर चांगलाच निशाणा साधला आहे. अनेकजण ट्रोलिंग करत असाताना काहींनी तिच्या या लूकचं, तिच्या सौदर्याचं कौतुकही केलेलं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर तिच्या या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनानं हा फोटो शेअर करत गालिबचा एक ‘शेर’ही शेअर केला. ‘मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले…,’ या शेरनंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More