पुणे महाराष्ट्र

पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

पुणे | पुण्यात उद्यापासून (1 जानेवारी) हेल्मेटसक्ती लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुण्यातल्या रस्त्यांवर दुचाकी गाडी चालवणार असाल तर तुम्हाला डोक्यात हेल्मेट घालावे लागेल. जर डोक्यात हेल्मेट नाही घातलं तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. 

हेल्मेटसक्ती वरून पुण्यात बराच वाद निर्माण झाला होता. पुण्यातल्या काही संघटना हेल्मेटसक्तीच्या विरोधात होत्या, त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता.

परंतू, वाढते अपघात लक्षात घेता पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, याअगोदरही पुणेकरांनी हेल्मेटसक्ती हाणून पाडली होती. आता नव्याने होणाऱ्या हेल्मेटसक्तीला ‘पुणेकर’ कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

-अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

-तो म्हणाला, मी भाजपचा नेता आहे; पोलीस म्हणाला; मग तर अजून मारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या