बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही पिताय तो चहा भेसळयुक्त चहा पावडरपासुन तर बनवलेला नाही ना?, असं ओळखा

नवी दिल्ली | चहा हे प्रत्येक घरात दररोज बनवलं आणि पिलं जाणारं पेय आहे. चहा पिल्याशिवाय भारतात दिवसाची सुरूवातच होऊ शकत नाही, असं बोललं जातं. मात्र तुम्ही बाजारातून जी चहा पावडर आणताय ती नेहमीच शुद्धच असते असं नाही. सध्या संधी मिळेल त्याठिकाणी अन्नपदार्थामध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे आता ही भेसळ कशी ओळखायची? हा मोठा प्रश्न आहे.

अन्नपदार्थांतील भेसळ ही सध्याची गंभीर समस्या बनलेली आहे. त्यातच आपण दिवसातून अनेकवेळा पित असलेल्या चहामध्येही जर भेसळ असेल तर? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर एफएसएसएआय म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलं आहे. एफएसएसएआय नागरिकांना भेसळयुक्त पदार्थांपासून दुर ठेवण्याचं काम करत असतं. एफएसएसएआयने नुकताच ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

चहा पावडरमधील भेसळ ओळखण्यासाठीची एक चाचणी एफएसएसआयने ट्विट केलेल्या व्हिडीओतून सांगितली आहे. त्यासाठी एक फिल्टर पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर त्या पेपरवर थोडी चहापावडर ठेवा. त्यावर काही थेंब पाणी टाकून चहा पावडर ओली करा. त्यानंतर तो फिल्टर पेपर पाण्याने धुवा. त्यानंतर तो फिल्टरपेपर उन्हात जाऊन पाहा जर त्यावर तपकिरी रंगाचा डाग पडलेला असेल तर समजून जा चहामध्ये भेसळ आहे.

एफएसएसएआय अन्नपदार्थांमधील भेसळीसंदर्भात जनजागृती करण्याचे काम करते. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना आढळून येतात. त्यामुळे एफएसएसएआयने आत्तापासून भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यास सुरूवात केली आहे.

पाहा व्हिडीओ –

 

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

“प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, माझ्यावर कारवाई केली जाऊ नये”

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अशी होती पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिक्रीया

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More