Top News

बाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण!

नवी दिल्ली | आता बाटलीबंद पाण्याची चव तुम्हाला वेगळी लागण्याची शक्यता आहे. कारण यापुढे बाटलीत बंद असलेल्या पाण्याची चव बदलणार आहे. हे असं का होणार आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

तर अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने पाण्याच्या बाटल्यांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वामुळे पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे.

या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक लीटर पाण्याच्या बाटलीत 20 मिलीग्रॅम कॅल्शियम तसंच 10 मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावं लागणार आहे. मिनरल्स हे चवीसाठी चांगले मानले जातात. मात्र फिल्टरच्या प्रकियेत ते काढले जातात. परंतु ग्राहकांच्या फायद्यासाठी ते पुन्हा टाकण्यात येणारेत.

हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोन वेळ देण्यात आला होता. मात्र, आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2020ची तारिख निश्चित केली. त्यामुळे आता हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होईल.

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहितीु

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या