बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरात पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपाचा साठा चक्क एका दिवसात पुर्णपणे संपला

जळगाव | लॉकडाऊनच्या संकटामुळं सामान्य नागरीकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलिटर 89.75 इतका आहे.

जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळं लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला. याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल, डिझेल नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. मात्र, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल, डिझेल विकत घेतले.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. मुंबईत पेट्रोल 98.36, डिझेल 89.75 रूपये आहे. पुण्यात पेट्रोल 98.06 तर डिझेल 88.08 आहे. नवी मुंबईत पेट्रोल 98.56, डिझेल 89.94 रूपये आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल 98.76, डिझेल 88.76 असा दर आहे. तर, औरंगाबादमध्ये पेट्रोल 99.60, डिझेल 90.99 असा दर आहे.

दरम्यान, दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमुद केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल, डिझेलची विक्री होते. तर, मोबाईलवरून एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती तुम्हाला मिळू शकते.

थोडक्यात बातम्या

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे पोलिसांनी वर्षभरात तब्बल एवढ्या पुणेकरांवर केली मास्क न वापरल्याबद्दल कारवाई

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 92 टक्यांवर

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More