बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं

मुंबई | महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेला गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीतून अजिबात दिलासा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पेट्रोलियम कंपन्यांकडून वाढवण्यात येत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली तरी देखील भारतातील इंधनाचे दर मात्र चढेच असल्याचं दिसून येतंय. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 35 पैशांची वाढ करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. आज मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 115.50 रुपये मोजावे लागत आहेत तर डिझेलनेही आता उच्चांक गाठत एक लिटर डिझेलसाठी तब्बल 106.62 रुपये मोजावे लागत आहेत.

तेल उत्पादक देशांच्या म्हणजेच ओपेकची महत्त्वाची बैठक पार पडणार असून पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलांच्या वाढत्या दरांबाबत काय निर्णय होतो?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशा मागणीने जोर धरला असताना सरकारने मात्र हे दर नियंत्रणात आणण्यासाठी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More