बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम काय?

नवी दिल्ली | महागाई आधीच गगनाला भिडली आहे आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची सततची वाढ सर्वसामान्यांचा ताण वाढवत आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. असं असलं तरी पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र इंधनाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची सुट देण्याचा निर्णय घेतलेला नाही. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व सामान्यांना वाढत्या इंधन दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा दिला होता. तसेच सध्या गेल्या 13 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यानुसार आज मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर असून 94.14 रुपये प्रति लिटर विक्री करण्यात येत आहे.

सर्वसामान्य नागरिक सतत होणाऱ्या इंधन दरवाढीला कंटाळला होता. तसेच सरकारने याबाबत ठोस पावलं उचलावी अशी मागणी देखील करण्यात येत होती. त्यातच केंद्राने त्याबाबत निर्णय घेतला. पण आता सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झालेली असताना इंधनाच्या किंमती मात्र जेथे थे असल्याचं दिसून येतंय.

2 दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्यावरून भाष्य करत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अमेरिकेत ठरतात, असं विधान केलं होतं. त्यासाठी केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं होतं. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटल्या.

थोडक्यात बातम्या

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

खळबळजनक! 10 हजार द्या अन् बोगस कोरोना रूग्ण घ्या

राज्यातील ‘या’ भागात पुढचे 4-5 दिवस विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

हजारो पुणेकरांना लसीचा एकही डोस नाही; लसीचे दोन्ही डोस कधी पूर्ण होणार?

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काही प्रमाणात वाढ, पाहा आकडेवारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More