बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मुंबई | देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून गेल्या काही महिन्यांपासून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्यासाठीही सरकारला सुचवण्यात आले. पण जीएसटी परिषदेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याने ते होऊ शकत नाही, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यातच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर करून नवे दर आज जाहीर केले. गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये 3 वेळा कपात करण्यात आली असून आजही कोणती दरवाढ न करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक राज्यांच्या कर आकारणीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यनिहाय वेगवेगळ्या दिसून येतात. तसेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकत्रित पेट्रोल वर 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर लागू करतात. केंद्र सरकार उत्पादन शुल्क म्हणून पेट्रोलवर 32.90 रु तर डिझेलवर 31.80 रू आकारते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत लक्षात घेऊन तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ इंधनाची किंमत ठरवून त्यानुसार नवे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात. नव्या दरानुसार मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर 96.98 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 87.96 रुपये प्रतिलिटर एवढा आहे. तसेच राजधानी दिल्लीत हा दर पेट्रोलसाठी 90.56 रुपये प्रति लिटर तर डिझेल साठी 80.87 रुपये प्रति लिटर एवढा आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीलाच पेट्रोल दरवाढीतून काही प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थिनीवर गॅंगरेप करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातली गोळी!

‘विषाणू ऐवजी ‘वसुली’ टार्गेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं’

कोरोनाची दुसरी लाट सर्वात खतरनाक, मुंबईची दिवसभराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक

महाराष्ट्राची आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी, एक पाऊल लॉकडाऊनच्या दिशेने!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More