बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत किरण गोसावी लखनऊमधून फरार

लखनऊ | मुंबईतील कथित कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खान त्याच्या अन्य साथीदारांसह सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात आहेत. आर्यन खानला अटक करण्यात आली होती तेव्हा एनसीबीचा पंच असलेला किरण गोसावी आर्यन खानच्या अटकेनंतर फरार आहे.

किरण गोसावी हा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे लपून बसला होता. त्याने स्वत:हून पोलिसांना शरण येणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, पुण्यातील फरासखाणा चौकीचे पोलीस तिथं जायच्या आधीच किरण गोसावी पळून गेल्याची माहिती समोर आलेली आहे. पुणे पोलिसांना फार शिताफीने गोसावीचा ठावठिकाणा लागला होता.

किरण गोसावी उत्तर प्रदेशमधील मंडियांव पोलिस ठाण्यामध्ये शरण येणार होता. पण तो पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये आलाच नाही. पुणे पोलिसांचे पथक पोहचण्याआधीच त्याने पोबारा केला आहे. त्याच्या मोबाईल लोकेशननुसार तो सध्या फत्तेपूर सिक्रीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, प्रभाकर साईलने केलेले आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी शाहरूख खानकडे कोणतीही खंडणी मागितली नाही, असं किरण गोसावीनं म्हटलं आहे. किरण गोसावीवर पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आरोपी आहे. सध्या पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

“युद्धपातळीवर आढावा बैठका सुरू पण, येत्या 6 महिन्यात…”

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

“…मग आर्यन खान दोषी कसा? त्याला पकडणं हा एक ट्रॅप”

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More