फूलपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, समाजवादी पक्षांचा मोठा विजय

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसलाय. फूलपूरमध्ये भाजपचा पराभव झालाय तर गोरखपूरमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचं दिसतंय. 

फूलपूरमध्ये सपाचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपच्या कौशलेंद्र पटेल यांना 59,613 मतांनी पराभव केला. विशेष बाब म्हणजे हा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ आहे.

दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये सपाचे प्रवीण निषाद विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.