10 हजारच्या गुंतवणुकीतून मिळाला 13 कोटींचा फंड!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | शेअर मार्केट दिलं तर ते भरभरुन देत नाहीतर काहीचं नाही असं अनेकदा झाल्याचं पहायला मिळतं. यात जोखीम असल्यामुळे अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) गुंतवणुकीचा पर्याय शोधतात. त्यातदेखील अनेकदा प्रचंड नफा मिळाल्याचं पहायला मिळतंय.

म्युच्युअल फंडच्या एका गुंतवणुकीने लोक मालामाल झाले आहेत. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. यात तुम्ही केलेली छोटी गुंतवणूक नंतर तुम्हाला बराच फायदा देऊ शकते.

निप्पाॅन इंडिया ग्रोथ (Nippon India Growth) फडांने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. हा फंड मिड कॅप स्टाॅक्समध्ये (Mid Cap Stocks) गुंतवणूक करतो. हा फंड मोठ्या वाढीच्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करतो. ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

मार्निंगस्टारने 3 स्टार रेटिंग आणि व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहेत. 8 ऑक्टोबर 1995 ला या फंडचा निधी सुरु करण्यात आला आहे. आता त्याला 27 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. या फंडाने सुरवातीचा फंडाला 22.29 % चा सीएजीआर(CAGR) दिला आहे.

गेल्या वर्षी या फंडाने 11.89% एसआयपी तर तीन वर्षात 27.53% परतावा दिला आहे. त्यामुळे या फडांत गुंतवणूक (investment) केली असती तर तुमच्या 10 हजार रुपयांच्या मासिक एसआयपीसह तुमची जी गुंतवणूक 3.6 लाख रुपयांवरुन 5.31 लाख रुपये झाली असती.

या फंडाने 21.20 % इतका वार्षिक परतावा गेल्या पाच वर्षात दिला आहे. तुमच्या 10 हजारच्या 6 लाख रुपयांची गुंतवणूक 10.08 लाख रुपयांपर्यंत वाढली असेल. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या नोकरीच्या सुरवातीच्या काळात गुंतवणूक केली असती तर त्यांच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) त्यांच्याकडे मोठी रक्कम जमा झाली असती.

महत्त्वाच्या बातम्या