बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना आमदाराचा मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आमदारांची मनधरणी सुरू केली आहे. त्यातच आमदार आशिष जैस्वाल यांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी मंत्र्यावर गंभीर आरोप केल्याने एकचं खळबळ उडाली आहे. काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही आशिष जैस्वाल यांनी म्हटलं आहे. आमदार आहेत म्हणून सरकार आणि मंत्री आहेत. निधीवाटपाबाबत नाराजी कायम आहे, असं आशिष जैस्वालांनी बोलून दाखवलं आहे.

मतदारसंघाला न्याय मिळायला हवा. निधीचा असमतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरचं निधी दिला जातो, असा गंभीर आरोप आशिष जैस्वाल यांनी केला आहे. आमच्यासाठी अगोदर मतदारसंघ, त्यानंतर पक्ष आणि महाविकास आघाडी महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवावे, असं आशिष जैस्वाल म्हणाले.

दरम्यान, निवडणुकीमुळे छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना आणि अपक्षांच्या भूमिकांना धार येते. मात्र, जैस्वाल हे शिवसेनेचेचं आहेत. ते नाराज नाहीत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमदार आशिष जैस्वाल यांच्या आरोपानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलला जाणार का?; आरबीआयने स्पष्टचं सांगितल

भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने जागतिक स्तरावर भारताचं स्थान खराब झालं-राहुल गांधी

“भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते”; सदाभाऊ  खोत संतापले

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More