बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

बीड | बीडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचं लॉकडाऊन केलं. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. आता बीडमधून एक लक्ष विचलित करणारी घटना समोर येत आहे. बीडमधील एका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंबाजोगाईतील हा फोटो आहे. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. मांडवा रोडवरील स्मशानभूमित हा प्रकार घडला.

बीडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. अंबाजोगाईमध्ये एकाच दिवसात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि धक्कादायक म्हणजे नगरपालिकेकडून एकाच सरणावर या आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्वाराती आणि लोखंडी सावरगाव या दोन्ही सेंटरमधील एकूण आठ रुग्णांवर एकाचवेळी नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीतही जागा अपुरी पडू लागली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. जागा मिळेल तिथे नातेवाईक दाहसंस्कार करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झालेय. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,13,354 झाली आहे. तर काल 297 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More