बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान, नव्या फंगसमुळे 2 डॉक्टरांचा मृत्यू, आधीच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त

नवी दिल्ली | जवळपास गत दोन वर्षापासून जग कोरोना (Corona) महामारीशी लढत आहोत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave) देशाचं सर्वाधिक नुकसान केलं आहे. अशातच आता फंगस (Fungus) या आजारानं डोकं वर काढल्याची बातमी समोर आली आहे. परिणामी देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कार्य करण्याची वेळ आली आहे.

दिल्ली एम्समधील डाॅक्टरांनी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पलमनरी डिजिज या स्ट्रेननं पिडीत दोन रूग्णांना एस्परगिलस लेंटुलस (Aspergillus lentulus) झाल्याची नोंद केली आहे. या रूग्णांना शर्थीच्या प्रयत्नांनंतरही वाचवण्यात अपयश आलं आहे. परिणामी दिल्ली एम्सच्या डाॅक्टरांकडून कोरोना किंवा तत्सम आजारांना हलक्यात न घेण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

एस्परगिलस लेंटुलस या आजारात एस्परगिलस फंगसची लक्षण आहेत. किंबहुना लेंटुलस ही फंगसचीच एक प्रजाती असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. फंगसच्या इतर स्ट्रेनच्या तुलनेत या आजारात अधिक मृत्यूदराची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या पहिल्या रूग्णाचं वय हे 50-60 दरम्यान होतं. तर दुसऱ्या रूग्णाचं वय हे 45 च्या आसपास असल्याची माहिती आहे.

दरम्यान, डाॅक्टरांच्या निष्कर्षानुसार आपल्या देशात फंगच्या या स्ट्रेननं मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असू शकते. जगात या स्ट्रेनबद्दल पहिल्यांदा 2005 मध्ये माहिती सांगण्यात आली आहे. आपल्या देशात दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक प्रकारचं नवीन स्ट्रेन सापडलं होते. त्यानंतर आता हा स्ट्रेन सापडल्यानं डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

“भाजपने अन्नदात्याचा केलेला अपमानाला देश विसरणार नाही”

‘त्या’ बहूचर्चित पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पुर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More