Future Maharashtra CM | सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. याचसह राज्यातील माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देखील याआधी धुरा सांभाळली होती. मात्र आता मतदारांना महाराष्ट्र राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल? (Future Maharashtra CM) याबाबत सवाल आहे. याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेमध्ये मतदारांनी भाजपच्या बड्या नेत्याला पसंती दिली आहे.
राज्यातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल?
लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात केवळ 17 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असा सवाल एका सर्व्हेच्या माध्यमातून केला गेला. त्यामध्ये भाजपच्या नेत्याला सर्वाधिक पसंती दिली. (Future Maharashtra CM)
राज्याचा मुख्यमंत्री कोण? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मतदारांनी भाजपच्या नेत्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहून अधिक भाजपच्या नेत्याला भावी मुख्यमंत्री पसंती देण्यात आली आहे. (Future Maharashtra CM)
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावसं वाटतं? असा सवाल सर्व्हेत करण्यात आला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना राज्याचे आगामी मुख्यमंत्री बनवावं असा मतदारांचा कल आहे. नितीन गडकरींच्या भावी मुख्यमंत्री नावाला पसंती देण्यात आली आहे. (Future Maharashtra CM)
सर्व्हेंच्या मतांची आकडेवारी आली समोर
भाजपच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहायला आवडेल असं विचारलं गेलं, तेव्हा मतांनुसार टक्केवारी काढण्यात आली आहे. 18.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. 47.7 टक्के लोकांनी नितीन गडकरींना पसंती दिली आहे. तर विनोद तावडेंना 6.3 टक्के पसंती दिली आहे. तर 14.5 टक्के एकनाथ शिंदेंना तसेच 5.3 टक्के अजित पवारांना पसंती दिली.
तसेच उद्धव ठाकरेंना लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी 22.4 टक्के पसंती दिली. 6.8 टक्के लोकांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेते नाना पटोले यांना 4.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
News Title – Future Maharashtra Cm Survey
महत्त्वाच्या बातम्या
पुढील 5 दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार; ऑरेंज अलर्ट जारी
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…
निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य