बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गब्बरला धक्क्यावर धक्के! घटस्फोटानंतर विश्वचषक संघातूनही वगळलं

नवी दिल्ली | आंतराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.  बीसीसीआयने 18 खेळाडूंची नाव जाहीर केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन खेळाडूंना संघात संधी देण्यात आली. मात्र, भारताचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनला संघात स्थान दिलं गेलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकाविरूद्ध झालेल्या टी-20 मालिकाही भारताने खिशात घातली होती. त्यामुळे टी-20 विश्वचषकासांठी संघात संधी न दिल्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मागील वर्षी युएईमध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएलमध्ये शिखरने तुफान खेळी केली होती. त्यामुळे त्याला संघातील स्थान पक्क असेल अशी अपेक्षा होती.

अलिकडेच पत्नी आयेशा मुखर्जीबरोबर घटस्फोटाच्या बातम्या येत असताना भारतीय टी-20 विश्वचषकसाठी निवड न झाल्याने भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनला मोठा धक्का बसला आहे. 2017 साली आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीमध्ये शिखर धवनने भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. चॅम्पियन ट्राॅफीमध्ये एक दमदार शतक ठोकत दोन अर्धशतकांच्या जोरावर सर्वाधिक 338 धावा केल्या होत्या.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघाचा मेन्टॉर असणार आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

#T20WorldCup | विराटचा हुकमी एक्का असलेल्या ‘या’ खेळाडूला बीसीसाआयने दिला डच्चू

#T20WorldCup | धोनीचं पुनरागमन! बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय शिलेदारांची यादी जाहीर, बीसीसीआयने केली घोषणा!

2 खेळातील 2 दिग्गजांची होणार भेट???; कोहली-रोनाल्डो मँचेस्टरमध्ये भेटण्याची शक्यता

बाबो! किंग कोब्रा सर्पमित्रावर गेला धावून, फणा पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, पाहा व्हिडीओ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More