गडचिरोलीत झालेल्या चकमकीत २ महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली | सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ महिला नक्षलवादी ठार झाल्यात. मुंगनेर-येनगावच्या जंगलात हा प्रकार घडला.

जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी याठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवले. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत २ महिला नक्षलवादी ठार झाल्या.

दरम्यान, सोमवारी रानवाही जंगलात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली होती.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या