बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गडचिरोलीत झालेल्या नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद

गडचिरोली | नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात आज पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले आहेत. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावा जवळच्या जंगलात आज सकाळी 6 ते साडे सहा दरम्यान ही चकमक झाली.

आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल आणि सी-60 पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर देत गोळाबार केला. तसेच  या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आलं. तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

दरम्यान, शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

महत्वाच्या बातम्या-

निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर टीका; बाळासाहेब थोरातांचं चोख प्रत्युत्तर

मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More