अमरावती | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी एका नेत्याला वजन कमी केल्यानंतर 50 कोटी देण्याचं वक्तव्य केलं होतं. अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देवाचा आशिर्वाद म्हणून लग्नानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कसं होणार?. तुम्हालाही काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल. अशा वक्तव्यामुळे संपूर्ण सभागृहात हशा पिकला होता. या गोष्टी मात्र लगेच समजतात, असा टोलाही त्यांनी लगावला. देवानं दिलं आणि देवानं नेलं अस नको व्हायला. तुम्हालाही थोडेफार प्रयत्न करावे लागतील, असंही ते म्हणाले.
मी एक संत्र्याचा निर्यातदार आहे, असं म्हणत त्यांनी त्यांचा 20 वर्षापूर्वीचा कलामाचा अनुभव सांगितला. आपल्याला आणखी थोड्या दिवसांनी पाच हजार कोटी संत्री निर्यात करायची आहे. त्यामुळे सरकारच्या काही अडचणी आहेत. तुमच्या काही अडचणी आहेत. त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. 100 टक्के संत्र्याची क्वालिटी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असंही ते शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले. तसेच वरुड-मोर्शी मधील नर्सरीवाल्यांनी चांगल्या दर्जाच्या संत्र्याच्या कलमा तयार कराव्या, असंही त्यांनी सागितलं.
फवारणीसाठी शेतकऱ्याना लाखो रूपये मोजावे लागतात. तसेच डिझेलसाठी-पेट्रोलसाठी आणखी पैसे भरावे लागतात. पाच वर्षात पेट्रोल-डिझेल हद्दपार होईल. यापुढे आता इथेनाॅल (Ethanol) च्या वापरावर भर दिला जाईल. तसेच फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून दिले जातील. तोच ड्रोन इथेनाॅलवर चालेल. शेतकऱ्यांन ड्रोन भाड्याने मिळेल यांची व्यवस्था मी करणार आहे, असं ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा
इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का
Comments are closed.