Top News देश पुणे महाराष्ट्र राजकारण

…नाहीतर काम उखडून फेकीन; पुण्यात नितीन गडकरींची कंत्राटदाराला तंबी!

पुणे |  केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आपल्या दर्जात्मक कामासाठी ओळखले जातात. त्याची कामं करण्याची उरक लक्षात घेता त्यांना मोदी सरकारमध्ये दळणवळण खात्याचा पदभार पुन्हा देण्यात आला. रस्त्यांची कामं करण्यात त्यांचा हात कुणीच धरु शकत नाही, असा दावा देखील केला जातो. याशिवाय कामाचा दर्जा उत्तम राखण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या पुणे दौऱ्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

नितीन गडकरी यांनी पुण्यातल्या चांदणी चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत त्यांनी कंत्राटी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. आम्ही ‘मालपाणी’वाले लोक नाही त्यामुळे काम व्यवस्थितच झालं पाहिजे, अशी तंबी त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली.

आधीही या कंत्राटी कंपनीला नागपूरमध्ये उड्डाणपुलाचं काम दिले होतं. नागपूरच्या उड्डाणपुलाच्या कामासारखं इथंही काम निकृष्ट दिसल्यास काम उखडून टाकील. मला अशी कामं चालणार नाहीत.  महापालिका, वाहतूक पोलिसांची मदत घेऊन  एका वर्षाच्या आत काम मार्गी लावा, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

संरक्षण खातं जमीन अधिग्रहणात वेळ खाऊपणा करत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आधीच या प्रकल्पाला दीड वर्ष उशीर झाला आहे. चांदणी चौकातील पुलाचं काम ऑगस्ट 2021 पर्यत पूर्ण करणं अपेक्षित होतं. परंतू जमीन अधिग्रहाणामुळे कंत्राटदारांना जानेवारी 2023 पर्यत मुदत वाढवून दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात आम्हाला येत आहेत ‘या’ अडचणी- पोलीस

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

“ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ कामधंदे सोडून ‘या’ गोष्टींमध्ये जातोय”

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

सैराटमध्ये लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजीलाही लागली लॉटरी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या