बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

मुंबई| देगलुुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. देगलुुर-बिलोली येथे प्रचार करण्यासाठी काँग्रेस नेते आणि मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये 36 चा आकडा असल्याचं वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची होती बरं झालं असं नितीन गडकरींनी आपल्याला सांगितलं आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी खोडसाळ राजकारण करू नये, असं म्हणत नितीन गडकरींनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात कोणतीही गोष्ट सांगितली नाही, असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं आहे. महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना कधीही कोणतीही गोष्ट सांगितली नाही. विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पुर्णत: निराधार आणि बेजबाबदारपणाचे आहे, असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

दरम्यान, फडणवीसची जिरवायची होती, बरं झालं जिरली असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे, असा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात कारवाई करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे, असा जोरदार टोला नितीन गडकरींनी लगावला आहे. अशा प्रकारचा संभ्रम विजय वडेट्टीवार आमच्या बाबतीतही निर्माण करू पाहतात, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

 थोडक्यात बातम्या- 

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; जाणून घ्या नेमकं काय आहे ‘TRUTH SOCIAL’

“मंत्रालय बंद असताना शरद पवारांच्या शागिर्दांनी 15 हजार कोटी लुटले”

मॅंचेस्टर युनायटेडची आयपीएलमध्ये एन्ट्री; ‘हा’ संघ विकत घेण्याची शक्यता

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

बाॅलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More