युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग

मुंबई |  युती होणार की नाही अशी साशंकता व्यक्त केली जात असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह ‘मातोश्री’वर युतीच्या चर्चेसाठी जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून भाजपला गेल्या काही दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच ‘युती’च्या प्रकरणात जातीनं लक्ष घालण्याचं ठरवलेलं दिसतंय.

शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करतीय. दररोज ‘सामना’मधून टीकेचे ‘बाण’ भाजपच्या जिव्हारी लावण्यात शिवसेना यशस्वी ठरतीय.

तर दुसरीकडे शिवसेनेनं ‘मोठा भाऊ’ होण्याचा आग्रह कायम ठेवला असून 1995 च्या जागावाटपाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

Google+ Linkedin