देवणी | संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) हे कार्यसम्राट आमदार आहेत. ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आमदार करा. निवडणुकी नंतर केवळ आमदार नाही तर मंत्री म्हणून ते काम करतील. संभाजीरावांना मंत्रिपद मिळण्याची हमी मी घेतो, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
निलंगेकरांबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य
मतदारसंघातील रेल्वेमार्गासाठी आपण निलंगेकरांच्या (Sambhaji Patil Nilangekar) पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जन स्वाभिमान सभेत गडकरी बोलत होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर रशियाची धोरणे स्वीकारली.त्या धोरणांचे परिणाम काय झाले? हे आज आपण पाहत आहोत. सरकारी विमान कंपन्या तोट्यात गेल्या. सोन्याच्या खाणीही तोट्यात गेल्या. याशिवाय जिथे काँग्रेसने हात घातला तिथे नुकसानच झाले. त्याऐवजी काँग्रेसने गावाच्या विकासाला गती दिली असती तर हे चित्र दिसले नसते. लोकशाहीत बदल घडविण्यासाठी योग्य धोरण आणि नीतीची गरज असते, असे गडकरी म्हणाले.
संभाजीराव पाटील निलंगेकर हे स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडविणारे प्रभावी आमदार आहेत.त्यांच्या पाठीशी राहत प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही गडकरी यांनी केले.ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये संभाजीराव पाटील यांचे काम मोठे आहे. अक्कांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलवण्यास विरोध असताना संभाजीराव पाटील शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते. हा पुतळा न हलविण्याच्या सूचना निलंगेकर यांच्यामुळेच आपण दिल्याचेही गडकरी म्हणाले.
यावेळी बोलताना निलंगेकर यांनी सांगितलं की, मतदारसंघाच्या विकासासाठी जे- जे मागितले ते सर्व देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे.दिल्लीत महाराष्ट्राच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस अशी गडकरी यांची ओळख आहे.लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात लक्ष घालावे अशी मागणी करत देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी निलंगेकर यांनी आपल्या भाषणात केली.
संभाजीराव पाटील दमदार नेता- नितीन गडकरी
आपल्या भाषणात नितीन गडकरी म्हणाले की,आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे दमदार आमदार आहेत.ते कार्यसम्राट,मराठवाड्याचे दमदार नेते व महाराष्ट्रातील कार्यक्षम युवा नेते आहेत.त्यांची कार्यपद्धती उत्तम असून काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!
शरद पवारांचा सदाभाऊ खोतांना मोठा धक्का!
ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का, कल्याणमधील बड्या नेत्याने सोडली साथ
शिंदे गटाचे 8 आमदार, एक मंत्री ठाकरेंकडे परत येणार?