बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

पुणे | पक्षांमध्ये कितीही वाद असले तरी महाराष्ट्राच्या विकासाच्या सर्वपक्ष एकत्र येतात, असा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात आज दोन उड्डाणपुलांचे उद्धाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितीन गडकरींचा फोन आला होता. त्याचा एक किस्सा अजित पवारांनी आज पुण्यात बोलताना सांगितला आहे.

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हटले की, मला सकाळी गडकरी साहेबांचा फोन आला. मध्यंतरी गडकरी साहेब म्हणाले होते की, मी मुंबईला येतो. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, तू आणि अधिकाऱ्यांची टीम असेल, असं अजित पवारांना नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

गडकरी साहेबांचा ज्यावेळेस मला फोन आला. अजित जरा लवकर ये… असं गडकरी साहेबांनी सांगितलं. तेव्हा पुलाच्या डिझाईन बद्दल बोलण्यासाठी 15 मिनिटं अगोदर बोलावल होतं, असंही अजित पवार म्हणाले. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितल होत की, उद्या गडकरी साहेबांचे दोन कार्यक्रम आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यानी गडकरी साहेबांना जी वेळ सोयीची असेल त्यावेळेस आपण भेटू, असं अजित पवारांनी बोलताना सांगितलं.

दरम्यान, निवडणुका झाल्यानंतर विकास काम करत असताना दोन नेत्यांमध्ये समन्वय असावा, असं अजित पवार म्हणाले. राज्य सरकारचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू परंतु, विकासकाम करत असताना एकमेकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

स्वाभिमानीचंही एकरकमी FRPसाठी डिजिटल आंदोलन, सहभागी होण्याचं आवाहन

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More