गोव्यात गडकरींच्या ‘मास्टरप्लॅन’मुळे हुकली काँग्रेसची सत्तास्थापनेची संधी

पणजी | नितीन गडकरींनी छोटया पक्षांबरोबर केलेल्या यशस्वी वाटाघाटींमुळे गोव्यात काँग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकली. 2017 साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जास्त जागा जिंकूनही भाजपाने सत्ता स्थापन केली होती.

आम्हाला अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत लागणार होती. नव्या सरकारचे खातेवाटप निश्चित झाले असून हे सरकार चांगली कामे पुढे सुरु ठेवेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसकडे 14 आमदार आहेत मात्र राज्यपालांकडे फक्त तीन आमदार गेले. बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही आम्हाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांची नावे सादर केली, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, विधानसभेतही आम्ही बहुमत सिद्ध करु. आता कुठला हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही, असंही गडकरींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

-कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे