बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बोल्ड चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका, राजने मला…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाची प्रतिक्रिया

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि नामांकित उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणे आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणे हा आरोप करण्यात आला आहे. अशातच ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठने राज कुंद्राचं समर्थन केलं आहे. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी प्रकरणात गहनाला आणि राज कुंद्राला अटक झाली आहे.

बोल्ड आणि इरॉटिक चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका, अशी विनंती गहनाने सर्वांना केली आहे. मी राज कुंद्राच्या कंपनीसोबत 3 चित्रपटांसाठी काम केलं आहे. राजने मला कधीच कोणती गोष्ट करण्यास जबरदस्ती केली नाही. मला चित्रपटात असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर आक्षेप नव्हता किंवा तिला सेटवर काम करताना कोणतीच अडचण आली नसल्याचं गहना वशिष्ठ म्हणाली.

जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात कुठेच अश्लिलता नाही, ते अश्लिल चित्रपट नाहीत. ज्यांना शंका आहे ते गुगलवर जाऊन शोधू शकतात आणि त्यापैकी कोणताच चित्रपट पॉर्नमध्ये मोडला जाऊ शकत नाही, असंही गहनाने म्हटलं आहे. गहनाने व्हिडीओ शेअर करत राज कुंद्राचं समर्थन केलं आहे.

दरम्यान, एकता कपूरच्या ‘गंदी बात’ आणि कित्येक चित्रपटांप्रमाणे हे काही व्हिडीओ आहेत. ज्यामध्ये बोल्ड कंटेंट असतात. मला असं वाटतं की, आधी तुम्ही ते व्हिडीओ बघा आणि मग ठरवा व्हिडीओ अश्लील आहेत की नाही, गहना म्हणाली.

थोडक्यात बातम्या- 

राज कुंद्राची एडल्ट कंटेटबाबतची ‘ती’ व्हॉट्सअ‍ॅप चाट लीक!

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही- आशिष शेलार

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?- चित्रा वाघ

शार्लिन चोप्रा आणि राज कुंद्रामध्ये झाला होता ‘हा’ मोठा करार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More