गुंड गजा मारणेच्या टोळीची धिंड; तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं

Gajanan Marne Gang

 Gaja Marne Gang | पुण्यात गुंड गजा मारणे टोळीतील (Gaja Marne Gang) सदस्यांनी 19 फेब्रुवारी रोजी आयटी (IT) अभियंत्याला मारहाण केली होती. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ आणि अमोल तापकीर यांना अटक करून त्यांची धिंड काढली.

कोथरूडमध्ये खळबळ

आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, कोथरूडमध्ये गुंडांच्या टोळक्याने तरुणावर गोळीबार करत तलवार, कोयत्याने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि. 23) मध्यरात्री घडली. गौरव अविनाश थोरात (22, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

37 वर्षांत 28 गुन्हे, मारणेसह टोळीवर मोक्का

गुंड गजा मारणे याच्यावर गेल्या 37 वर्षांत 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडाला दोनदा तडीपार केले होते. तसेच, यापूर्वी चार वेळा मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर (Mumbai-Pune Expressway) त्याची आलिशान कारमधून भव्य मिरवणूक काढली होती, ज्याद्वारे त्याने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले होते.

शहरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरोधात सर्वसामान्यांची तक्रार असेल, तर त्यांनी थेट पोलिस आयुक्तालयात (Police Commissioner Office) गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे (DCP) ती नोंदवावी, यासाठी एक विशेष डेस्क (Desk) बनवला आहे. तेथे तक्रार येताच तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

आरोपींची ओळख परेड होणार

कोथरूडमध्ये भरदिवसा तरुणाला मारहाण करणाऱ्या मारणे टोळीशी संबंधित तीन आरोपींची ओळख परेड होणार आहे. खून झालेल्या ठिकाणाहून पोलिसांनी गावठी पिस्टल, तलवार, सत्तूर जप्त केले आहे. ( Gaja Marne Gang)

कोणताही गुन्हेगार शांत आहे, तोपर्यंत आम्ही त्याला काहीही करणार नाही. मात्र, किरकोळ स्वरूपाचा जरी गुन्हा कोणत्याही गुन्हेगाराने, टोळीने, टोळीप्रमुखाने केला, तर त्याच्यावर त्यापेक्षा 100 टक्के जास्त कारवाई करू. मुख्य प्रवाहात राहायचे असेल तर गुन्हेगारी सोडावी लागेल; अन्यथा त्यांच्यावर जोरात कारवाई केली जाणार आहे, असं अमितेश कुमार यांनी सांगितलंय.

Title : Gaja Marne Gang Paraded Firing and Sword Attack on Youth in Kothrud

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .