गजानन किर्तीकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर; अगोदर लेकाविरोधात प्रचार केला, आता म्हणतात…

Gajanan kirtikar | उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. येथे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अमोल किर्तीकर उभे राहिले आहेत. तर, महायुतीकडून येथे शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलंय.

मात्र, अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असून त्यांनी आपल्या स्वतःच्या लेकाविरुद्धच इथे प्रचार केला. त्यांच्या पत्नी मेघना किर्तीकर या आपल्या मुलाच्या अमोल किर्तीकर यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुटुंबातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात लेक उमेदवार असातना बाप विरोधात प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. अखेर गजानन किर्तीकर यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. कालच गजानन किर्तीकर यांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांनी आपल्या मुलाची बाजू घेत तोच विजयी होणार, असं म्हटलं होतं. आज (21 मे) स्वतः गजानन किर्तीकर यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गजानन कीर्तिकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर

“दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते, पण मी वेगळं मत मांडलं आणि एकटा पडलो. आज मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, असं म्हणत गजानन कीर्तीकरांनी मनातील खंत बोलून दाखवली.

तसंच पुढे बोलताना त्यांनी “अमोल त्याची संघटना सोडून कुठेच जाणार नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी भेटून देखील अमोलला सांगितलं होतं. पण, तो शिवसेनेत आमच्यासोबत आला नाही.”, असा गौप्यस्फोट देखील गजानन कीर्तीकरांनी (Gajanan kirtikar ) केला. तसंच महाविकास आघाडीला देखील चांगल्या जागा मिळतील, असा दावाच कीर्तीकरांनी केला.

अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर लढत

दरम्यान, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेसाठी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. मात्र, अमोल कीर्तिकरांचे वडील खासदार गजानन कीर्तिकरांनी (Gajanan kirtikar) रवींद्र वायकर यांचा प्रचार केलाय. त्यामुळे इथली लढत अजूनच रंगतदार झालीये.

News Title – Gajanan Kirtikar Big statement

महत्त्वाच्या बातम्या-

“नवऱ्याने एकनाथ शिंदेंसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणं मला अजिबात पटलं नाही”

पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!

कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट तर ‘या’ भागाला अवकाळी झोडपणार