Gajanan kirtikar | उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. येथे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अमोल किर्तीकर उभे राहिले आहेत. तर, महायुतीकडून येथे शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलंय.
मात्र, अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असून त्यांनी आपल्या स्वतःच्या लेकाविरुद्धच इथे प्रचार केला. त्यांच्या पत्नी मेघना किर्तीकर या आपल्या मुलाच्या अमोल किर्तीकर यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुटुंबातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं.
गजानन कीर्तिकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर
उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात लेक उमेदवार असातना बाप विरोधात प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. अखेर गजानन किर्तीकर यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. गजानन किर्तीकर यांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांनी आपल्या मुलाची बाजू घेत तोच विजयी होणार, असं म्हटलं होतं. आता स्वतः गजानन किर्तीकर यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते, पण मी वेगळं मत मांडलं आणि एकटा पडलो. आज मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, असं म्हणत गजानन कीर्तीकरांनी मनातील खंत बोलून दाखवली.
ठाकरेंच्या उमेदवाराचं शिंदे गटाच्या खासदाराकडून कौतुक
तसंच पुढे ते म्हणाले की, “अमोल निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तो उद्धव ठाकरेंसोबतच आहे. त्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफर दिली होती.त्याला शिंदेंनी विधानपरिषदेसह अनेक आमिष दिलीत पण तो कणखर होता.त्याने ठाकरेंसोबत राहणं निवडलं.इतके आमिष दाखवूनही अमोल निष्ठावंत राहिला.”, असं गजानन किर्तीकर म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं तोंडभरून कौतुक केलंय.
दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांचे (Gajanan kirtikar ) सूर काहिसे बदल्याचे आता दिसून येत आहेत. त्यांनी अमोल किर्तीकर निष्ठावंत आहेत. अनेक अमिष दाखवूनही तो शिंदेंकडे गेला नाही, असं म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या गजानन किर्तीकर चर्चेत आले आहेत.
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर लढत
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेसाठी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. मात्र, अमोल कीर्तिकरांचे वडील खासदार गजानन कीर्तिकरांनी (Gajanan kirtikar) रवींद्र वायकर यांचा प्रचार केलाय. त्यामुळे इथली लढत अजूनच रंगतदार झालीये. आज गजानन किर्तीकर यांनी मुलाचं कौतुक करत स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय.
News Title – Gajanan Kirtikar praised Amol Kirtikar
महत्त्वाच्या बातम्या-
‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातलं अख्खं गाव विकत घेतलं!
महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत आहे तरी किती? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले