…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक
पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याच्यावर आणखी खटले नसल्यानं त्याला सोमवारी तळोजा कारागृहातून सोडण्यात आलं होतं. मात्र पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे. गजानन मारणे जेलमधुन सुटल्यावर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. मारणे याच्याविरोधात कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मारणे टोळीतील मुलांनी आणि त्याच्या चाहत्यांनी एक्सप्रेस हायवेवरुन चित्रपटाप्रमाणे त्याची मिरवणुक काढली. मुंबईहून पुण्याकडे येताना या गाड्यांचा एकामागोमाग एक ताफाच निघालेला पहायला मिळाला. या गाड्यांच्या मिरवणुकीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. गजानन मारणेला त्याच्या चाहत्यांचा उत्साह चांगलाच नडला आहे. जेलमधून बाहेर आला नाही तर त्याला पुन्हा अटक झाली आहे. गजानन मारणेच्या स्वागतासाठी मिरवणुकीमध्ये जवळजवळ 500 गाड्या आल्या असल्याची माहिती आहे.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 साली गजानन मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. काही काळ येरवडा कारागृहात ठेवल्यानंतर त्याची कोल्हापूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सध्या तो तळोजा कारागृहात होता.
दरम्यान, गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळीमध्ये वर्चस्व वादावरून टोळीयुद्ध रंगतं की काय अशा चर्चांणा उधाण आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई
रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…
“शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादीसाठी स्त्री-दाक्षिण्य केवळ भाषणात बोलायचे मुद्दे”
राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार का?; राजेश टोपे म्हणाले….
राज्यपालांनी एकही असंवैधानिक कृत्य केलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.