Top News पुणे महाराष्ट्र

मुळशी पॅटर्न! पुण्यातील ‘त्या’ थरारक खून प्रकरणी 20 जणांची निर्दोष मुक्तता

पुणे, 3 फेब्रुवारी 2021 | पुण्यातील टोळीयुद्ध सर्वांनाच माहिती आहे. दुसऱ्या टोळीचा नायनाट करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही टोळ्यांमध्ये राडे चालू असतात. अशाच प्रकारे पुण्यातील टोळी युद्धात गाजलेल्या अमोल बधे खूनप्रकरणातील गजानन पंढरीनाथ मारणे याची त्याच्या 20 साथीदारांसह निर्दोष मुक्तता झाली आहे.

29 नोव्हेंबर 2014 मध्ये पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीजवळ नीलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथादारांना अटक करण्यात आली होती.

विश्रामबाग येथे दाखल खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश श्री ए वाय थत्ते यांनी हा न्यायनिवाडा केला असून पुराव्या अभावी आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 3 गावठी पिस्तुल, 2 काडतुसे, 11 लोखंडी कोयते, 10 मोबाईल आणि वाहन जप्त केले होते.

थोडक्यात बातम्या-

‘अभिनेत्री वॅाशरुमध्ये असताना…’; पंचतारांकित हॅाटेलमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

‘शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर…’; नितेश राणे आक्रमक

“हरामी सर्जील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे”

‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या