Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

Photo- Facebook/Gajanan Marne Video Screegrab

पुणे | गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील या मिरवणुकीनं राज्याच्या कायदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तब्बल 300 पेक्षा जास्त गाड्या या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गजा मारणेला त्यानंतर गजाआड केलं, मात्र आता या मिरवणूक प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गजा मारणे तुरुंगातून बाहेर पडताच लँड क्रूझर गाडीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. ही गाडी पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या नेत्याची असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच या प्रकरणात पोलिसांचे कान टोचले होते, मात्र राष्ट्रवादीच्याच नेत्याचं या प्रकरणात नाव आल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित गाडी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नावावर नाही तर त्याच्या चुलत्याच्या नावावर आहे, मात्र तो नेता रोजच ही गाडी वापरत असल्याचं सगळ्यांना माहीत आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्यानं 2014 साली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तसेच 2017 साली महापालिका निवडणूक देखील लढवली होती. 2012 साली हा नेता काँग्रेसच्या तिकीटावर महापालिकेच्या रिंगणात उतरला होता. सध्या तो राष्ट्रवादीतच आहे.

गजा मारणेच्या मिरवणुकीत वापरण्यात आलेली ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडी अशी तिची नोंद करण्यात आली आहे, अर्थात न्यायालयामार्फत ही गाडी सोडवली जाऊ शकते. मात्र अशाप्रकारे गुंडाच्या रॅलीसाठी स्वतःची गाडी दिल्यानं राष्ट्रवादी या नेत्यावर काही कारवाई करणार का?, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने

पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ जंगी मिरवणुकीवर अजित पवार म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या