Top News पुणे महाराष्ट्र

गुंड गजा मारणे फरार, पोलिसांची पथकं घेत आहेत शोध

पुणे | तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यत रॅली काढणारा गुंड गजा मारणे अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली असून ती त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

गजा मारणेला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली, पण त्यानंतर देखील गजा मारणेवर आणखी काही गुन्ह्यांप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे.  या अटकेपासून वाचण्यासाठी गजा मारणे फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमोल बधे आणि पप्पु गावडे यांच्या हत्या प्रकरणातून गजा मारणे तळोजा कारागृहातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी कारागृहापासून पुण्यापर्यत 500 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबई-पुणे महामार्गावर धुडगूस घातला होता. त्यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गजा मारणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने या गुन्ह्यात गजा मारणेची जामिनावर सुटका केली होती.

दरम्यान, वारजे पोलिस ठाण्यात गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याप्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल असून या प्रकरणात पोलीस गजासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत, तरुणावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!

परीक्षेला गेलेल्या मुलीचा प्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

आता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट!

मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या