पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेची २ खून खटल्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याच्यावर आणखी खटले नसल्यानं त्याला सोमवारी तळोजा कारागृहातून सोडण्यात आलं. यावेळी त्याचे शेकडो समर्थक तळोजा कारागृहाच्या गेटबाहेर उपस्थित होते.
गजानन मारणेच्या स्वागतासाठी 500 गाड्या आल्या होत्या, अशी माहिती आहे. मुंबईहून पुण्याकडे येताना या गाड्यांचा एकामागोमाग एक ताफाच निघालेला पहायला मिळाला. या गाड्यांच्या मिरवणुकीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात २०१४ साली गजानन मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. काही काळ येरवडा कारागृहात ठेवल्यानंतर त्याची कोल्हापूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सध्या तो तळोजा कारागृहात होता.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गजानन मारणेची सुटका करण्यात आली. त्यानंतर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यापर्यंत त्याचं शक्तिप्रदर्शन पहायला मिळालं. रात्री उशिरा तो कोथरुडमधील आपल्या घरी पोहोचला. मात्र त्याच्या पुण्यातील एन्ट्रीची एकच चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.
पाहा व्हिडीओ-
थोडक्यात बातम्या-
आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!
रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?
प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली