Maharashtra l गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते पार्थ पवार वादात अडकले होते. कारण या दोन्ही नेत्यांचा सत्कार पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याने केला होता. त्यामुळे या नेत्यांवर प्रचंड टीका केली जात होती. अशातच आता भाजपचे नेते अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विरोधकांनी भाजपवर केला हल्लाबोल :
भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप पक्षावर टीका होऊ लागली आहे. यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे याने केला होता.
अशातच अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील खासदार निलेश लंके यांचा देखील सत्कार गजानन मारणे याने केला होता. त्यावेळी भाजप पक्षाने खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मात्र आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांनी टीकेची तोफ सोडली आहे.
‘लाडके गुंड‘
कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे,… pic.twitter.com/jIM7KilKSd
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2024
Maharashtra l नेमकं प्रकरण काय? :
कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा गजानन मारणे याने काल दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला आहे. त्यावेळी त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले होते. गजानन मारणे हा पुणे येथील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तसेच चंद्रकांत पाटील हे देखील कोथरूडचे आमदार आहेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची चंद्रकांत पाटील यांची जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र यापूर्वी देखील या गुंडासोबत भाजपचे काही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची एकप्रकारे संधीच मिळाली आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुख्यात गुंड गजानन मारणे यांचा सत्कार करतानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे, आणि त्यामध्ये ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन देखील दिले आहे.
News Title : Gajanan Marne felicitated BJP leader Chandrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन
Jio चा ग्राहकांना आणखी एक दणका?, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सोन्याचा दिलासा?, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव